उंदरांमुळे नागपूरला धोका; उंदरामुळे स्क्रब टायफस आजाराचा प्रसार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

राज्याच्या उपराजधानीला उंदरांपासून धोका निर्माण झालाय. होय तुम्ही जे ऐकताय ते खरं आहे. नागपूर जिल्ह्यात स्क्रब टायफस या आजाराचा वेगानं प्रसार होतोय. स्क्रब टायफस हा आजार ज्या चिगर माईटमुळे होतो. तो चिगर माईट उंदरांच्या अंगावर आढळतो. उंदरांमुळे स्क्रब टायफसच्या गोचिडाचा प्रवास होत असल्यानं आता आरोग्य विभाग सतर्क झालाय. पुण्यातून एक टीम उंदिर पकडण्यासाठी नागपुरात दाखल झालीय.

स्क्रब टायफसचे आतापर्यंत सोळा बळी गेलेत. रुग्णांची संख्या शंभराच्या घरात पोहचलीय. हा स्क्रब टायफसचा आणखी फैलाव होऊ नये यासाठी आता आरोग्य यंत्रणा उंदरांच्या मागं हात धुवून पडलीय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live