भारतीय सैन्याने पाकमध्ये पुन्हा सर्जिकल स्ट्राईक केल्याचे गृहमंत्र्यांचे संकेत 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

भारतीय लष्कराने दोन-तीन दिवसांपूर्वी भारत-पाक सीमेवर सर्जिकल स्ट्राइकसारखी मोठी कारवाई केली असल्याचे संकेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेत. राजनाथ सिंह यांनी काहीही स्पष्टपणे सांगितलं नसलं तरी शहीद बीएसएफ जवान नरेंद्र कुमार यांची निर्घृण हत्या आणि मृतदेहाच्या विटंबनेचा बदला घेतल्याचं अस्पष्टपणे सांगितलंय.

''पाकिस्तानने बीएसएफ जवानाची हत्या करून त्याच्या मृतदेहाची ज्या पद्धतीने विटंबना केली होती.. विश्वास ठेवा, सगळं काही ठिक-ठाक झालंय, दोन-तीन दिवसांपूर्वी आणि पुढेही बरंच काही होईल, लवकरच दिसेल काय होतंय ते'', असं राजनाथ सिंह म्हणाले.

WebTitle : marathi news second surgical strike done by indian in pakistan rajnmath singh 

संबंधित बातम्या

Saam TV Live