अयोध्या निकालाचं काऊंटडाऊन सुरू..!

अयोध्या निकालाचं काऊंटडाऊन सुरू..!

नवी मुंबई - अतिसंवेदनशील अशा बाबरी मशीद- राम जन्मभूमी जमीन वादाची सुनावणी आता अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचलीय. 
दसऱ्याच्या सुट्टीनंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरवात झाली. त्या पार्श्वभुमीवर अयोध्या जिल्ह्यात 10 डिसेंबरपर्यंत कलम 144 लागू करण्यात आलंय.. 
आजपासून जमावबंदीचे आदेशही देण्यात आलेत...

येत्या 17 ऑक्टोबरपर्यंत अयोध्येच्या अतिसंवेदनशील प्रकरणाचा निकाल अपेक्षित आहे... त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव अयोध्येत पोलिसांचा मोठा फौजफाट तैनात करण्यात आलाय...
सुरक्षा व्यवस्थेसाठी 200 शाळा आरक्षित करण्यात आल्यात... खबरदारी म्हणून कलम 144 ही लागू करण्यात आलंय... यानुसार 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमता येणार नाही...
शिवाय 10 डिसेंबरपर्यंत टीव्हीवरील चर्चांनाही बंदी घालण्यात आलीय...

सरन्यायाधीश रंजन गोगोई याच्या नेतृत्वाखालील 5 न्यायाधीशांच्या घटनात्मक खंडपीठासमोर  6 ऑगस्टपासून अयोध्येची सुनावणी सुरु आहे... सरन्यायाधीश रंजन गोगोई लवकरच निवृत्त होणार आहेत.. 
त्यामुळे निवृत्तीपूर्वी या खटल्याचा निकाल अपेक्षित आहे. दरम्यान या सुनावणीला पुरेसा वेळ मिळावा यासाठी दररोज 1 तास अधिक आणि शनिवारीही सुनावणी घेण्याचा सल्ला सरन्यायाधिशांनी दिलाय.

अयोध्याच्या या अतिसंवेदनशील प्रकरणावर आज मुस्लिम पक्ष आपली बाजू मांडतायत.. त्यानंतर हिंदू पक्षकारांना युक्तीवाद करण्यासाठी 2 दिवस दिले जातील. 
शेवटी 17 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अपेक्षित आहे... वादग्रस्त जमीन प्रकरणात न्यायालयाचा निकाल आल्यानंतर परिस्थिती स्थिर ठेवण्यासाठी
अयोध्या जिल्हा प्रशासनाला अलर्टवर ठेवण्यात आलंय.

Web Title : Section 144 applies In Ayodhya

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com