#Section377 होणार रद्द, समलैंगिक संबंध हा गुन्हा नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

#Section377 होणार रद्द, समलैंगिक संबंध हा गुन्हा नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

परस्परसंमतीने ठेवल्या जाणाऱ्या समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाऱ्या भारतीय दंड विधानाच्या कलम ३७७ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुप्रीम कोर्टाने आज ऐतिहासिक निकाल दिला. समलैंगिक संबंध गुन्हा नाही असं सांगत सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिलाय. देशातील प्रत्येकाला समानतेचा अधिकार असून आधी केलेल्या चुका आता सुधारण्याची गरज असल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटलं. 

कोर्टाने म्हटलंय देशात सर्वांना समान अधिकार असायला हवेत.  जुन्या विचारसरणीला बाजूला सारायला हवं. आधी केलेल्या चुका आता सुधारण्याची आता गरज आहे आणि समाजाने पूर्वग्रहदूषित विचारधारेपासून मुक्त व्हायला हवं. मात्र सहमतीशिवाय समलैंगिक संबंध ठेवणं गुन्हाच असेल. त्याचबरोबर मुलं आणि जनावरांशी अनैसर्गिक लैंगिक संबंध गुन्ह्याच्या कक्षेत येतील. 

कलम 377 अन्वये समलैंगिक शारीरिक संबंध हा गुन्हा मानला जायचा. कलम 377 नुसार समलिंगी संबंध ठेवल्यास दहा वर्षांपासून जन्मठेपेची शिक्षा होती. 

WebTitle : marathi news section 377 lgbt rights supreme court gives historic decision 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com