ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग काळाच्या पडद्याआड

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 9 नोव्हेंबर 2018

पुणे- अनेक गाजलेल्या नाटकांमधून महत्त्वाची भूमिका साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांचे आज (ता.09) शुक्रवारी पहाटे पुण्यात वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्या 79 वर्षांच्या होत्या. अनेक गाजलेल्या नाटकांमधून त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. रंगभूमीवरील 'बंडखोर अभिनेत्री' म्हणून त्यांना ओळखले जात असे.

कमला, सखाराम बाईंडर, गिधाडे, रथचक्र या नाटकांतील त्यांच्या भुमिका विशेष करुन गाजल्या. त्यांनी नाटकांच्या माध्यमातून साकारलेल्या भुमिकांमधून केवळ मनोरंजन न करता सामाजिक संदेश देण्यावर त्यांनी नेहमी भर दिला. मुळच्या गोव्याच्या असलेल्या लालन सारंग ह्यांची कारकिर्द मुंबईत आणि अखेरचे काही वर्षे त्यांनी पुण्यात व्यतीत केली. 26 डिसेंबर 1941 रोजी त्यांचा गोव्यात जन्म झाला होता.

लालन सारंग यांना ग.दि. माडगूळकर प्रतिष्ठानचा विद्याताई माडगूळकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तसेच, पिंपरी चिंचवडच्या कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फेही त्यांना कलागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 2006 साली कणकवली येथे झालेल्या 87व्या मराठी नाट्यसंमेलनाच्या त्या अध्यक्षादेखिल होत्या.

WebTitle : marathi news senior marathi actress lalan sarang passes away at the age of seventy nine 

संबंधित बातम्या

Saam TV Live