सगळ्यांच्या लाडक्या ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचं निधन

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

मुंबई - ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचं आज पहाटे मुंबईत राहत्या घरी निधन झालं. त्या 72 वर्षाच्या होत्या. दिर्घ आजाराने मुंबईतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. 

शुभांगी जोशी यांना गेल्या आठवड्यात अर्धांगवायूचा अटॅक आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आयसीयूत त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता. प्रकृती खालावतच गेल्याने अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. 

'काहे दिया परदेस' या झी मराठीवरील मालिकेत त्यांची गौरीच्या आजीची भूमिका गाजली होती. सध्या 'कुंकू टिकली आणि टॅटू' या मालिकेत त्या काम करत होत्या. 'आभाळमाया' मालिकेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या अचानक जाण्याने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 

Web Title: senior marathi actress shubhangi joshi passed away

संबंधित बातम्या

Saam TV Live