हुतात्म्याच्या मुलाला मिठीत घेऊन त्यांनी अश्रूंना करून दिली वाट....

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 जून 2019

जम्मू-काश्मीर : श्रीनगरमधील पोलिस अधिकारी व त्यांच्या कडेवर चार वर्षांचा मुलगा असा एक फोटो कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा भावनिक फोटो पाहून डोळे पाणावणे सहाजिक आहे. जम्मू-काश्मिरमध्ये मागील आठवड्यात बुधवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पोलिस अधिकारी अरशद खान हुतात्मा झाले. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले, यावेळचा हा फोटो आहे.

The son of Martyr #ArshadKhan in the lap of SSP Srinagar Dr.M.Haseeb Mughal JKPS during the wreath laying ceremony at District Police Lines Srinagar. pic.twitter.com/EqGApa82Rh

— J&K Police (@JmuKmrPolice) June 17, 2019

श्रीनगरचे एसएसपी हसीब मुगल यांनी हुतात्मा अरशद खान यांच्या चार वर्षाच्या मुलाला- उहबानला कडेवर घेतले आहे. अंत्यसंस्कारावेळी हसीब मुगल यांना अश्रू अनावर झाले व खान यांच्या मुलाला मिठीत घेऊन त्यांनी अश्रूंना वाट करून दिली. हा मुलगा इतका लहान आहे की, त्याला त्याच्यावर काय संकट ओढावले आहे, याची जाणीवही नाही. उहबानला 18 महिन्यांचा लहान भाऊ आहे. त्याला या वयात मोठ्या भावाचे कर्तव्य करावे लागणार, या भावनेने उपस्थितांना व पोलिसांनाही रडू कोसळले. 18 महिन्यांचा दामिन लोकांकडे बघतो व हासतो, त्याला तर वडिल म्हणजे काय हे कळायच्या आतच वडिलांचे छत्र हारपले आहे. 

बुधवारी झालेल्या दहशतवादी हल्यात खान गंभीर जखमी झाले होते. त्यांना दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांची प्राणज्योत रविवारी फादर्स डे दिवशी मालवली.   

Web Title: Senior police officer breaks down carrying son of martyred inspector

संबंधित बातम्या

Saam TV Live