ड्युटीवर असतांना पोलिसांनी कपाळावर गंध लावू नये..

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

नाशिक : ड्युटीवर असतांना पोलीसांनी कपाळावर गंध लावू नये असे निर्देश
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. पोलिसांनी ड्युटीवर असतांना गंध लावला तर त्यांना सक्त ताकीद ही शिक्षा असेल असे या निर्देशात सांगण्यात आले आहे. हा निर्देश नाशिक शहर परिमंडळ १ चे आयुक्त अमोल तांबे यांनी जारी केला. दरम्यान यानुसार ड्युटीवरील पोलिसांनी शिस्त पाळणं अपेक्षित असल्याचंही यात नमूद करण्यात आले आहे. सोबतच पोलिसांनी धर्मनिरपेक्ष असावे असे संकेत पोलीस खात्याकडून देण्यात आले आहेत.  

काय आहे या निर्देशात
दरम्यान नाशिकच्या भद्रकाली पोलीस स्टेशन येथे कर्तव्यावर असताना शिवजयंती बंदोबस्त करीत असताना सर्व अधिकारी व कर्मचारी ब्रिफिंग करताना तसेच सुचना देताना कपाळावर गंध लावून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समक्ष हजर होते. तसेच आपण पोलीस खात्यासारख्या शिस्तप्रिय खात्यात नोकरीस असून पोलीस खात्याच्या शिस्तीबाबत ज्ञान असून देखील पोलीसांनी कपाळावर गंध लावून कर्तव्यावर बंदोबस्त ब्रिफिंग करीता हजर होतात. ही बाब गंभीर स्वरुपाची असून पोलीस खात्याच्या नावलौकीकास बाधा आणणारे आहे. भविष्यात अशाप्रकारे कसूर आपणाकडून होऊ नये या करीता सक्त ताकीद देण्यात येत आहे.असे यात सांगण्यात आले आहे.

Web Title Senior Police Officer Directs To Police Should Be Secular

संबंधित बातम्या

Saam TV Live