अर्थसंकल्प मांडायला सुरवात केल्यानंतर शेअर बाजारात घसरण

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 5 जुलै 2019

अर्थसंकल्प 2019: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडायला सुरवात केल्यानंतर शेअर बाजारात किरकोळ घसरण झाली आहे. मात्र सकाळी बाजारात व्यवहार सुरु होताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने 40 हजार अंशांचा टप्पा गाठला आहे.  तर निफ्टीने 12 हजाराचा टप्पा गाठला आहे. गेल्या महिन्यात 4 जून रोजी सेन्सेक्सने 40 हजार 312 अंशांचा टप्पा गाठला होता. 

सध्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेंसेक्स 10.19 अशांच्या घसरणीसह 39 हजार 897.87 पातळीवर व्यवहार करतो आहे. तर निफ्टीमध्ये 15.10 अंशांची घसरण झाली आहे. निफ्टी सध्या 11 हजार 931.65 अंशांवर आहे.  मोदी सरकार नव्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणार आहे. परिणामी शेअर बाजार आणखी नवीन उच्चांक गाठेल अशी आशा या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

Web Title: Sensex down 100 pts, Nifty near 11,900

संबंधित बातम्या

Saam TV Live