5G सेवा सुरु करणारा 'हा' आहे जगातील पहिला देश..

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 4 एप्रिल 2019

सियोल : दक्षिण कोरियासारख्या छोट्याशा देशाने जगात पहिल्यांदा 5 जी सेवा देण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी रात्री 11 वाजता देशवासियांसाठी 5जी लाँच करण्यात आले. यामध्ये दक्षिण कोरियाने अमेरिका, चिनसारख्या देशांना मागे टाकले आहे.  

सियोल : दक्षिण कोरियासारख्या छोट्याशा देशाने जगात पहिल्यांदा 5 जी सेवा देण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी रात्री 11 वाजता देशवासियांसाठी 5जी लाँच करण्यात आले. यामध्ये दक्षिण कोरियाने अमेरिका, चिनसारख्या देशांना मागे टाकले आहे.  

यासाठी, दक्षिण कोरियाने यापूर्वी 5 एप्रिल ही देशात 5जी सेवा सुरु करण्यासाठी तारिख निश्चित केली असताना अमेरिकी कंपन्यांना हरवण्यासाठी दोन दिवस आधीच ही सेवा सुरु केली. 4 जीच्या तुलनेत 5जी 20 पटींनी वेगवान असणार आहे. दक्षिण कोरियाच्या टॉपच्या टेलिकॉम कंपन्या एसके, केटी आणि एलजी यूप्लस यांनी 5जी सेवा देशभरात देण्यास सुरुवात केली. 

कोरियाच्या 6 महत्वाच्या सेलिब्रिटींनी त्यांच्या फेनवर ही सेवा सुरु केली. यामध्ये पॉप बँडस् ईएक्सओचे दोन सदस्यांसह ऑलिंपिक आईस स्केटींगपटू किम यू ना सहभागी होते. सर्वसामान्यांना शुक्रवारपासून ही सेवा वापरता येणार आहे.

सॅमसंगच्या नव्या गॅलेक्सी एस10 5जी मॉडेलवर पहिल्यांदाच 5जीची सेवा सुरु करण्यात आली. सॅमसंगही देखील कोरियाचीच कंपनी आहे. सॅमसंगने फेब्रुवारीमध्ये हा फोन लाँच केला होता. या फोनची किंमत 2 हजार डॉलर आहे. 

नव्या 5जी सेवेमुळे देशात ड्रायव्हरलेस कारसारख्या क्षेत्रांना गती मिळण्याची अपेक्षा कोरियाला आहे. द. कोरियाने 5जी सेवेच्या जाहिरातीसाठी करोडो रुपये खर्च केले आहेत. एसके टेलिकॉमला 2019च्या शेवटी 10 लाखांहून अधिक ग्राहक जोडले जाण्याची आशा आहे. त्यांच्याकडे सध्या 4जीसाठी 2.7 कोटी ग्राहक आहेत. तर केटी कॉर्प 4जी पेक्षा स्वस्त प्लान देणार आहे.

WebTitle : Marathi news Seoul to become first country to start  5G service in the world


संबंधित बातम्या

Saam TV Live