पोलिसानेच केला महिलेचा विनयभंग..

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

तक्रार देण्यासाठी आलेल्या एका महिलेचा पोलीस कर्मचाऱ्याने विनयभंगकेल्याची धक्कादायक घटना चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साने चौकीमध्ये घडलीये. 

तक्रार देण्यासाठी आलेल्या एका महिलेचा पोलीस कर्मचाऱ्याने विनयभंगकेल्याची धक्कादायक घटना चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साने चौकीमध्ये घडलीये. 

आर. व्ही. पालवे असे गुन्हा दाखल झालेल्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याबाबत ३६ वर्षीय महिलेने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास महिलेच्या पतीने तिला मारहाण केली. तसेच घरातील सामानाची मोडतोड केली. यामुळे घर मालकाने याबाबत त्यांना विचारणा केली. पतीच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पीडित महिला साने चौक येथे रात्री अकरा वर्षांच्या सुमारास आली. 

त्यावेळी तेथे कर्तव्यावर आलेल्या पालवे याने महिलेच्या खांद्यावर हात ठेवत तिचा विनयभंग केला. त्यानंतर मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास पालवे याने पीडित महिलेला फोन करून सर्व काही ठीक आहे ना? अशी विचारणा केली. तसेच फोन ठेवण्याच्या वेळी त्याने पीडित महिलेला 'आय लव्ह यू' असेही म्हटले.

पीडित महिलेने ही बाब काँग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे यांना सांगितली. त्यानंतर कुदळे यांनी पीडित महिलेला घेऊन चिखली पोलिस ठाणे गाठले. तसेच विनयभंग करणाऱ्या पालवे यांच्या विरोधात फिर्याद दिली.

बुधवारी चिखली पोलिस ठाणे कार्यान्वित झाले. त्या अगोदर अवघ्या तासाभरापूर्वी ही घटना घडली. चिखली पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

WebTitle : marathi news sexual abuse by police in pimpri chinchwad


संबंधित बातम्या

Saam TV Live