शाहीद-मीराच्या घरी नविन पाहुण्याचे आगमन

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर पुन्हा एकदा बाबा झाला आहे. मीरा राजपूतने पुत्ररत्नाला जन्म दिला आहे. काल (ता. 5 सप्टेंबर) सायंकाळी 4 वाजता शाहीद आणि मीरा पुन्हा आई-बाबा झाले. मीशा नावाची त्यांना पहिली मुलगी आहे. मिशाच्या जन्मानंतर पुढच्या एका वर्षातच या जोडप्याला दुसऱ्या अपत्याचे वेध लागले असल्याच्या चर्चा होत्या.

मीरा च्या नावतला 'मी' आणि शाहीद च्या नावातला 'शा' अशी अक्षरं जोडत या जोडप्याने मुलीचे नामकरण केले होते. आता मुलासाठी त्यांनी काय नाव ठरवले आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता राहील.

7 जुलै 2015 ला शाहीद-मीराचे लग्न झाले होते. 26 ऑगस्ट 2016 ला मीशाचा जन्म झाला. बुधवारी सायंकाळी मीराला प्रसुतीच्या कळा सुरु झाल्यानंतर हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी रुग्णालयात मीराची आई बेला, शाहीदचे वडील पंकज कपूर, भाऊ इशान खट्टर उपस्थित होते. 

शाहीद कपूरने सध्या त्याच्या आगामी सिनेमाचे चित्रीकरण पुढे ढकलले असल्याचे कळते. सिनेमाचे शूटींग ऑक्टोबरमध्ये सुरु होईल.  

संबंधित बातम्या

Saam TV Live