शनी सरकारच्या नियंत्रणात 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 19 जुलै 2018

भक्तांच्या साडेसातीचं विघ्न हाटवणारा, अशी शनी शिंगणापूरच्या शनी देवाची ख्याती आहे. मात्र आता हे देवस्थान राज्य सरकारनं ताब्यात घेतलं आहे. राज्य सरकारकडून शनैश्चर देवस्थान विश्वस्त विधेयक 2018ला विधानसभेत मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे अगामी काळात शनी देवावर राजकारण्यांचा वरदहस्त राहणार आहे.

देवस्थानच्या कारभारावर भाजप आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह अनेकांनी आक्षेप घेतला होता. त्याचबरोबर ग्रामसभेनं ठराव करुन विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची मागणीही केली होती. या प्रकरणी सरकारनं समिती गठीत केली होती. या समितीच्या अहवालानुसार देवस्थान ताब्यात घेण्याचा सरकारनं निर्णय घेतला आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live