शापूरजी पालोनजीतर्फे ठाण्यातील पहिल्या गृहप्रकल्पाची घोषणा

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 14 मार्च 2019

शापूरजी पालोनजी या रियल इस्टेट ब्रँड ने आता ठाण्यातील निवासी गृहसंकुलाच्या बाजारपेठेत प्रवेश केलाय. शापूरजी पालोनजी यांच्यातर्फे ठाण्यातल्या पहिल्या गृहप्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. नॉर्दन लाईट्स असं या प्रकल्पाचं नाव आहे. तब्बल 4.8 एकर जमिनीवर हा प्रोजेक्ट विस्तारलेला असून या माध्यमातून ठाण्यात घर घेऊ पाहणार्यांना 2 बीएचके घरांसाठीचे वेगवेगळे पर्याय इथे उपलब्ध होणार आहेत.

“एमएमआर प्रदेशातील अग्रगण्य Real Estate मार्केटमधील ठाण्यात आमच्या पहिल्या प्रकल्पाची घोषणा करताना अतिशय उत्साह वाटतो आहे. हा प्रकल्प आमच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा भाग असून त्याद्वारे आम्ही मुख्य निवासी बाजारपेठांत प्रवेश करणार आहोत. आम्हाला या प्रोजेक्टमुळे आत्मविश्वास वाटतो की, आमचा या नव्याने शुभारंभ केलेल्या प्रोजेक्ट मुळे आम्ही ग्राहकांच्या उत्तम राहणीमानाच्या अपेक्षा नक्की पूर्ण करू”,  असं मत शापूरजी पालोनजी रियल इस्टेटचे सीईओ श्री. वेंकटेश गोपालकृष्णन यांनी व्यक्त केली 

ठाण्यातील सर्वोत्तम निवासी ठिकाण म्हणून नावारूपास आलेल्या पोखरण रोड नंबर 2 या भागात हा प्रोजेक्ट उभारण्यात येणार आहे. शापूरजी पालोनजी नॉर्दन लाईट्स हा अत्यंत विचारपूर्वक डिझाईन केलेला सर्वोत्तम प्रकल्प आहे. ज्यामध्ये आधुनिक जीवनशैलीच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यात पूल डेक, म्युझिक रूम, चिल्ड्रेन प्ले एरिया, इलेक्ट्रॉनिक गेमिंग रूम, लायब्ररी, स्विमिंग पूल, मल्टी-पर्पज लॉन, क्रिकेट पीच, वरिष्ठ नागरिकांसाठी कट्टा, अर्बन फार्मिंग झोन, अॅडव्हेंचर क्लायबिंग वॉल आणि पॉकेट गार्डन, युरेका फोर्ब्ज एअर आणि वॉटर प्युरीफायर यासारख्या 60 हून अधिक आधुनिक राहणीमानाच्या सुविधा असतील. असंही शापूरजी पालोनजी यांच्यातर्फे नमूद करण्यात आलंय.  

संबंधित बातम्या

Saam TV Live