डॉ. दाभोलकरांवर आम्हीच गोळीबार केला- कळसकर

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 26 जून 2019

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची  हत्या केल्याचे या प्रकरणातील संशयित शरद कळसकर याने न्यायवैद्यकीय चाचणीत कबुल केल्याचे सीबीआयने न्यायालयात सांगितले. याबाबत सीबीआयने मंगळवारी विशेष न्यायालयात अहवाल सादर केला. सध्या कारागृहात असलेले सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर यांच्या जामीन अर्जालाही सीबीआयने विरोधही केला. 

न्यायवैद्यकीय चाचणीत कळसकरने जून २०१८ मध्ये पुनाळेकर यांची भेट घेतल्याचे सांगितले. दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील शस्त्रे नष्ट करण्यासाठी पुनाळेकर यांचा सल्लाही घेतल्याचे त्याने मान्य केल्याचे सीबीआयने न्यायालयाला सांगितले. कळसकरची न्यायवैद्यकीय चाचणी करण्यात आली असून, या चाचणीत कळसकर आणि अंदुरेने डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती त्याने दिली आहे.

दाभोलकर यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोन मारेकऱ्यांपैकी कळसकर हा एक असल्याचे सीबीआयने त्यांच्या आरोपपत्रात म्हटले आहे. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ मध्ये पुण्यातील ओमकारश्वेर पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या चाचणीच्या आणि तपासाच्या आधारावर फेब्रुवारी २०१९ मध्ये दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात कळसकर आणि सचिन अंदुरेच्या नावाचा समावेश करण्यात आला होता. 

दरम्यान, पुनाळेकर हे या प्रकरणातील इतरांना जबाब देण्यापासून रोखण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना जामीन देण्याची ही योग्य वेळ नसल्याचे सीबीआयने त्यांच्या जामिनाला विरोध करताना न्यायालयाला सांगितले. 

सीबीआयने दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला २५ मे रोजी मुंबईतून अटक केली होती. दाभोलकर हत्या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोप आहे. 

Web Title:  Sharad Kalaskar confessed to killing Narendra Dabholkar during a forensic psychological analysis test says cbi in court

संबंधित बातम्या

Saam TV Live