ईडीच्या रडारवर शरद पवार आणि अजित पवार

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

शरद पवार आणि अजित पवार आता ईडीच्या रडारवर आलेयत. राज्य शिखर बँकेच्या कथित कर्जवाटप घोटाळ्याप्रकरणी ईडीनं ७० जणांवर गुन्हा दाखल केलाय. यात अजित पवारांसह शरद पवारांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलाय. यावर शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय.

शिखर बँकेच्या कथित कर्जवाटप घोटाळा प्रकरणाशी आपला कसलाही संबंध नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. आपण त्या बँकेच्या संचालकपदीही नव्हतो, असंही पवारांनी स्पष्ट केलंय. निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांसह इतर 70 जणांविरुद्ध ईडीने गुन्हा दाखल केलाय. राज्य सहकारी बॅंकेच्या संचालकांवर हे गुन्हे दाखल करण्यात आलेयत. याच एकूण सर्वपक्षीय 70 नेत्यांचा समावेश आहे.

राज्यात निवडणूकीची रणधुमाळी सुरू असताना राज्य सहकारी बँकेच्या कथित घोटाळ्यावरून ईडीनं ही मोठी कारवाई केलीय. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. राज्यभर केलेल्या दौऱ्यामध्ये लोकांचा मिळालेला प्रतिसाद बघून ही कारवाई केलीय का, असा सवालही पवारांनी सरकारला केलाय. ही कारवाई कशासाठी हे फडणवीसांनाच विचारा, असा उपरोधिक टोलाही पवारांनी लगावलाय.  

WebTitle : marathi news sharad pawar and ajit pawar on ed radar 

संबंधित बातम्या

Saam TV Live