पवार, ठाकरे बैठक संपली; बैठकीत नक्की काय ठरलं ?

Sharad Pawar, Uddhav Thackeray , Shivsena , NCP , Sharad Pawar And Uddhav Thackeray Meeting
Sharad Pawar, Uddhav Thackeray , Shivsena , NCP , Sharad Pawar And Uddhav Thackeray Meeting

महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना आता कमालीचा वेग आलाय आलाय. अशातच उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना पाठींबा देण्यासाठी विनंती केली आहे. अशातच मुंबईतील वांद्रे इथल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यात एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही  बैठक 50 मिनिटं सुरु होती. उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत, अजित पवार, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते बैठकीत उपस्थित होते. राष्ट्रवादीची प्रमुख मागणी शिवसेनेने अरविंद सावंत यांच्या राजीनाम्याच्या रूपाने मान्य केलेली आपल्याला पाहायला मिळाली.  

दरम्यान तब्बल 50 मिनिटं सुरु असलेल्या बैठकीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली असू शकते.. 
या मुद्द्यांवर झाली चर्चा ? 
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मिनिमल कॉमन प्रोग्रामवर चर्चा ? 
कॉंगेस शिवसेनेला कोणत्या प्रकारे पाठींबा देऊ शकते ? 
मुख्यमंत्री कुणाचा ? किंवा किती किती वर्षांचा ? 
राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री? 
राज्यातील सत्तास्थापनेत कश्या प्रकारे पदांचं वाटप होऊ शकतं ?
कॉंग्रेसने आतून पाठींबा दिला तर कश्या प्रकारे सत्ता वाटप होणार ?
महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना आता कमालीचा वेग आलाय आलाय. अशात सत्तास्थापन करण्यासाठी भाजपला राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचा पाठींबा घेतल्याशिवाय पर्याय नाहीये. दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी शिवेनेला  स्थापन करण्यास दिलेल्या निमंत्रणानंतर उद्धव ठाकरे यांनी स्वतः शरद पवारांना पाठींबा देण्यासाठी विनंती केल्याची माहिती सूत्रांकडून समजते. राज्याच्या सत्तेची समीकरणं जुळवण्यासाठी आता राष्ट्रवादी कॉंगेस आणि शिवसेना एकत्र येणार का?  हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडलाय. महाराष्ट्रातील या सगळ्या राजकीय घटना, सत्ता समीकरणं पाहता महाराष्ट्रीतील मुख्यमंत्री हे शरद पवारांच्या ग्रीन सिग्नल नंतरच बनू शकतो असं बोलायला वाव राहतो 

Webtitle : sharad pawar and uddhav thackeray meet in taj lands end

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com