आंदोलन करा, पण फेकाफेक नको ; पवारांचा शेतकऱ्यांना वडिलकीचा सल्ला

वैदेही काणेकर
सोमवार, 4 जून 2018

एक जून रोजी शेतकऱ्यांचा संप सुरू झालाय. आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध फेकण्यास सुरुवात केलीय. काही ठिकाणी शेतकरी शेतमालही रस्त्यावर फेकतायत. आंदोलनाचं हे स्वरूप पाहून शरद पवार व्यथित झालेत. आंदोलन योग्य आहे. पण आंदोलनाची पद्धत बदला असं आवाहन शेतकऱ्यांना केलंय. शेतकऱ्यांचं आंदोलन योग्य असून त्यांनी या आंदोलनातून माघार घेऊ नये असंही राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय. शेतमाल सामान्य आणि गरजूंमध्ये वाटून जास्तीत जास्त लोकांचा शेतकऱ्यांनी पाठिंबा मिळवावा असा शरद पवारांनी सल्ला दिलाय.

एक जून रोजी शेतकऱ्यांचा संप सुरू झालाय. आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध फेकण्यास सुरुवात केलीय. काही ठिकाणी शेतकरी शेतमालही रस्त्यावर फेकतायत. आंदोलनाचं हे स्वरूप पाहून शरद पवार व्यथित झालेत. आंदोलन योग्य आहे. पण आंदोलनाची पद्धत बदला असं आवाहन शेतकऱ्यांना केलंय. शेतकऱ्यांचं आंदोलन योग्य असून त्यांनी या आंदोलनातून माघार घेऊ नये असंही राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय. शेतमाल सामान्य आणि गरजूंमध्ये वाटून जास्तीत जास्त लोकांचा शेतकऱ्यांनी पाठिंबा मिळवावा असा शरद पवारांनी सल्ला दिलाय. या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं सांगतानाच स्वतःही आंदोलनात सहभागी होण्याची ईच्छा त्यांनी व्यक्त केलीय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live