VIDEO | पुतण्यांना तारणारे राजकारणातील काका!

साम टीव्ही न्यूज
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

पक्ष कोणताही असो महाराष्ट्राच्या राजकारणात काकांची भूमिका अतिशय महत्वाची राहिलीय. राज्याच्या राजकारणात सध्या अशाच एका काकांनी वादळ उठवून दिलंय. ज्यामुळे तीन पुतण्यांचा जीव टांगणीला लागलाय...पाहुयात हे सविस्तर विश्लेषण...

 

पक्ष कोणताही असो महाराष्ट्राच्या राजकारणात काकांची भूमिका अतिशय महत्वाची राहिलीय. राज्याच्या राजकारणात सध्या अशाच एका काकांनी वादळ उठवून दिलंय. ज्यामुळे तीन पुतण्यांचा जीव टांगणीला लागलाय...पाहुयात हे सविस्तर विश्लेषण...

 

राज्यातला सत्तासंघर्ष शिगेला पोहचलाय. अशात सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत त्या एकाच व्यक्तीवर...राज्यातलं सर्वात मोठं नेतृत्व शरद पवार यांच्यावर...राजकारणातील या बाप नेतृत्त्वावरच पुतण्यांची सारी भिस्त अवलंबून आहे. पक्ष आणि विचारधारा वेगवेगळी असली तरी पवारांशी सख्यत्व कुणाला नकोय...म्हणूनच तीन पुतण्यांनी काकांशी प्रचंड जवळीक साधलीय. 

राज ठाकरे

 राजकीयदृष्ट्या डबघाईला आलेलं मनसेचं नेतृत्व ईडीच्या चौकशीमुळे संकटात आहे. अशावेळी राज ठाकरेंचे एकच मार्गदर्शक काका शरद पवार...

उद्धव ठाकरे

सध्याच्या घडीला राजकीयदृष्ट्या अडचणीत...भाजपशी घेतलेला काडीमोड आणि बाळासाहेबांना दिलेला शब्द यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण कोण करणार तर तेही काकाच...शरद पवार

अजित पवार

सिंचन घोटाळा आणि राजकीय अपयशामुळे राजकारणात पिछेहाट...पण मुख्यमंत्री व्हायचं असेल तर अजित पवारांना कोण लागणार काकाच...

राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू वा मित्र नसतो...काका-पुतण्यांमधील नात्यानं ते दाखवून दिलंय. आता प्रत्येक पुतण्याला राजकारणात स्वत:चा आब दाखवून द्यायचाय. पण त्यांच्या नाड्या सर्वस्वी काकांच्याच हातात आहेत. त्यामुळे काका मला वाचवा अशी आर्जव करणाऱ्या पुतण्यांना पवार काका कसे तारतात, यावरच उभ्या महाराष्ट्राचं लक्ष केंद्रित झालंय. काकांमुळे या पुतण्यांचं राजकीय भवितव्य उंचावेलही पण काकांएव्हढी अचाट बुद्धिमत्ता चाणाक्यनिती कुठून येणार..हाही प्रश्न आहेच.

Web Title -  sharad pawar is god father of politics


संबंधित बातम्या

Saam TV Live