दरवाजा न उघडल्याने शरद पवार आतच अडकले

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 9 मे 2018

सातारा - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यात आले होते. तेथे पत्रकार परिषदेनंतर शरद पवार सभागृहाच्या बाहेर पडण्यासाठी निघाले. मात्र सभागृहाचा दरवाजा न उघडल्याने ते आत अडकले. अनेक जण दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र काही केल्या दरवाजा उघडत नव्हता. सुमारे दहा मिनिटाच्या प्रयत्नानंतर हा दरवाजा उघडला आणि शरद पवार बाहेर आले.

शरद पवार यांनी सकाळी 11च्या सुमारास पत्रकार परिषद घेतली. यावेळी काही पत्रकार आत येत असताना दरवाजा लॉक झाल्याचे समजले. दरवाजा न उघडल्याने सुमारे 10 मिनीटे सगळ्यांना ताटकळत उभे राहावे लागले. त्यानंतर दरवाजा तोडून सर्वांना बाहेर काढण्यात आले.

यावेळी पवारांच्या चेहऱ्यावर कोणतेही त्रासिक भाव नव्हते. ते सगळ्यांना शांत राहण्यास सांगत होते. तसेच त्यांनी हा प्रसंग अतिशय मिश्लिकपणे हाताळला.

संबंधित बातम्या

Saam TV Live