मराठा आणि बहुजनांमध्ये फुट पाडण्याचा राज्यकर्त्यांचा डाव हाणून पाडा; शरद पवारांचे पत्राद्वारे आवाहन

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

मराठा आंदोलनाला बदनाम करून मराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा राज्यकर्त्यांचा डाव आहे. राज्यकर्त्यांचा हा डाव हाणून पाडतानाच हिंसा, जाळपोळीचे प्रकार थांबवून आंदोलनकर्त्यांनी शांततेला प्राधान्य द्यावे, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय. 

शरद पवार यांनी एक पत्रक काढून मराठा आंदोलकांना हे आवाहन केलंय. मराठा आंदोलनाला बहुजनांचा पाठिंबा मिळालाय. त्याला धक्का लागेल असा प्रकार होणार नाही, याची मराठा आंदोलकांनी काळजी घ्यायला हवी, असं शरद पवारांनी या पत्रकात म्हटलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी आठरापगड जातींना आणि बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन आदर्श स्वराज्य निर्माण केलं होतं. त्या आदर्शांना धक्का लागेल असं आंदोलन करू नका, असं आवाहनही त्यांनी केलंय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live