...म्हणून मराठा समाजाचा उद्रेक झाला आणि ते आक्रमक झाले - शरद पवार 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 25 जुलै 2018

मराठा समाजातील तरूणांनी आजवर शांततेच्या मार्गानं आपल्या मागण्या मांडल्या. या समाजानं कायदा आणि सुव्यस्थेला धक्का लागू दिला नाही, असं असतानाही मुख्यमंत्री आणि इतर मंत्री चिथवणीखोर विधानं करत आहेत, ही अत्यंत खेदाची बाब आहे अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला सुनावलंय.

लेखी निवेदनाद्वारे त्यांनी सरकारवर टीका केलीय. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी विषयाचं गांभीर्य ओळखून या आंदोलनातील घटकांसोबत त्वरित संवाद साधावा. जेणेकरून सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान टळून सर्वसामान्यांना याची झळ बसणार नाही. असंही शरद पवारांनी आपल्या निवेदनात म्हंटलंय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live