होय! मला पाचवीच रांग दिली होती : शरद पवार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 जून 2019

पिंपरी :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यास मला पाचव्या रांगेतीलच आसन राखीव ठेवले होते, याचा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केला. ते म्हणाले, सोहळ्याच्या अगोदर आसन कोठे आहे, याची माहिती घेण्यासाठी माझा सचिव संबंधित खात्यात गेला होता. त्यावेळी आसन पाचव्या रांगेतीलच असल्याचे सांगितले गेले. या बाबत पुन्हा खात्री करण्यासाठी तो दोनवेळा गेला होता. त्यावेळीही त्याला तशीच माहिती देण्यात आली होती.

आता सरकारी अधिकारी म्हणत असतील की,पहिल्या रांगेतच आसन होते. रोमन लिपीत पाच आकडा असल्याने गोंधळ झाला वगैरे, त्यात आता फारसे तथ्य राहिलेले नाही.'' 

शरद पवार यांचा संतप्त सवाल
''आपला देश सर्वसमावेशक आहे. तरीही धर्माच्या नावावर मते मागितली जातात. देशाची निवडणूक सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवी वस्त्रे घालून दिवसभर गुहेत बसतात. जग कुठे निघालेय, विज्ञान काय सांगते आणि तुम्ही नव्या पिढीसमोर काय आदर्श ठेवताय. देशात ही कसली प्रवृत्ती वाढली आहे,'' असा संतप्त सवाल पवार केला. तसेच आता आपण समाजात त्याविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. कार्यकर्त्यांनी त्यासाठी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. 

पवार म्हणाले, "भाजप सरकारला गरीब, दलित, वंचित यांच्याविषयी अजिबात आस्था नाही. राज्यांमधील नेमके प्रश्‍न माहित नाहीत. महाराष्ट्रात गंभीर दुष्काळ आहे. त्यात राजकारण आणू नका. जनावरांना जगवा. माणसांबरोबरच जनावरांसाठीही पाण्याचे टँकर पुरवा. उद्या याबाबत सरकारबरोबर दुसरी बैठक होत आहे. महाराष्ट्रातील साखर कारखाने, मोठे औद्योगिक कारखाने, कंपन्या यांनी आपला वाटा म्हणून टँकर आणि चारा छावणीची जबाबदारी घ्यावी.'' 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live