लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर आता राष्ट्रवादीची आज चिंतन बैठक

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 1 जून 2019

मुंबई - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने उद्या (ता. १) सकाळी १० वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत लोकसभा निकालांवर चिंतन करण्यात येणार आहे. राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेससाठी पोषक वातावरण असताना मोठ्या फरकाने उमेदवारांचा पराभव झाल्याने ‘राष्ट्रवादी’ला धक्‍का बसला आहे. या बैठकीत पक्षात अनेक बदल करण्यात येतील, असे मानले जाते. 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ही बैठक होणार असून, त्यामध्ये लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा आढावा, त्याचबरोबर विधानसभा रणनितीवर चर्चा होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. 

दुपारी पक्षाची सर्वसाधारण बैठक होईल त्यामध्ये आमदार, खासदार आणि निवडणूक लढलेले नेते व कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहणार आहेत. या वेळी लोकसभा आणि आगामी विधानसभा याबाबत सविस्तर चर्चा केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

दरम्यान, बैठकीत जनमानसाचा अंदाज घेण्यात येऊन आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शरद पवार काही धाडसी निर्णय घेतील, अशी अटकळ बांधली 
जात आहे. पक्षसंघटनेत नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याचीही शक्‍यता आहे. त्यामुळे या बैठकीत शरद पवार भाकरी फिरवणार काय, याची उत्सुकता आहे.

Web Title: Sharad Pawar NCP Meeting Politics Nawab Malik

संबंधित बातम्या

Saam TV Live