पवारांच्या फिरकीने पृथ्वीबाबांना चकवलं !

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 26 नोव्हेंबर 2018

शरद पवार यांनी आज थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना फिरकी गोलंदाज करून चकविले. पवार यांचे राजकीय डावपेच हे फिरकीच्या कमी नसतात. त्यावर खेळणे हे त्यांच्या विरोधकांना सहज जमत नाही. साहजिकच त्यांनी टाकलेले बाॅल चव्हाणांना खेळता आले नाहीत. 

या दोघांचा खेळ रंगला तो आज पुण्यात. पवार यांचे सासरे व क्रिकेटपटू सदू शिंदे यांच्या स्मरणार्थ पुणे महापालिकेने मैदान उभारले आहे. त्याचे उदघाटन या दोन नेत्यांच्या हस्ते झाले. आता क्रिकेटचे मैदान असल्याने त्यावर खेळी करूनच त्याचे उदघाटन करण्याचे ठरले.

चव्हाण यांनी आधी बाॅल हाती घेतली होत तर पवारांनी बॅट. पण नंतर पवार यांनी बाॅल ताब्यात घेतला आणि चव्हाणांना फलंदाजीची संधी दिली. या वेळी जमलेले प्रेक्षक या डावाच्या उत्कंठतेने खूष झाले होते. पवार यांनी दोन फिरकी बाॅल चव्हाण यांना टाकले. चव्हाण यांना ते नेमके खेळता आले नाही. पवारांचे बाॅल टोलवले असते तर ती देखील मोठी बातमी झाली असती. त्यामुळे चव्हाण सावधपणे खेळले, असेच म्हणावे लागेल. पवारांनीही त्यांना आऊट न करता दोन्ही काॅंग्रेसमधील दोस्ताना कायम ठेवला.

सामना अनिश्चित राहिला असला तरी  महाराष्ट्राच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांचा खेळ पाहण्याची संधी तेथील उपस्थितांना मिळाली. पवार यांनी नंतर या बाॅलवर स्वाक्षरी करून ठेवली.    

संबंधित बातम्या

Saam TV Live