शरद पवारांचं ठाकरे सरकारसंबंधी अत्यंत महत्वाचं विधान

साम टीव्ही
मंगळवार, 26 मे 2020

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलं.

राजकीय पटलावर घडामोडींना वेग आलेला असताना शरद पवारांनी ठाकरे सरकारसंबंधी अत्यंत महत्त्वाचं विधान केलंय. काय म्हणालेत पवार? पाहा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलं. पण स्वत: शरद पवारांनी ठाकरे सरकारसंबंधी अत्यंत महत्त्वाचं विधान केलंय. 

उद्धव ठाकरे सरकार स्थिर आहे. ठाकरे सरकारला पाठिंबा देणारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पक्ष सरकारच्या पाठिशी मजबूत उभे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आहेत. कोरोना महामारीतून महाराष्ट्राला बाहेर काढायचं आहे. त्यासाठी सगळी ताकद लावायची हे सध्या उद्दिष्ट आहे. बाळासाहेब ठाकरे वारल्यानंतर एकदाच मातोश्रीवर गेलो होतो. मातोश्रीवर कोरोनाबाबत आढावा घेतला. पावसाळ्यात काय काळजी घ्यायची, रुग्णसंख्या वाढते आहे यावर चर्चा झाली. राजकारणाचा विषय सध्या नाही, या काळात कोण राजकीय बोलणार?

अशी भूमिका शरद पवारांनी मांडली. महाविकास आघाडीचे कर्तेधर्ते म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिलं जातं. शरद पवारांनी ठाकरे सरकार स्थिर असल्याची भूमिका स्पष्टपणे मांडलीय. राज्यात राजकीय पटलावर घडामोडींना वेग येत असला तरी शरद पवार यांची भूमिका खूप काही सांगून जाते.

Web Title - Sharad Pawar's very important statement regarding Thackeray government


 

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live