शार्क माशाचं अस्तित्व धोक्यात; फिन सूपसाठी 20 हजार शार्कचा बळी 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

शार्क माशाला समुद्राचा राजा असं म्हंटलं जातं. निसर्गचक्राच्या साखळीतील एक प्रमुख घटक म्हणून शार्कची ओळख आहे. पण हाच शार्कमासा आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. मुंबई आणि गुजरातच्या गोदांमामधून तब्बल आठ हजार किलो शार्क माशांचे कल्ले जप्त करण्यात आलेत. फिनसूपसाठी हे आठ हजार किलो कल्ले चीन आणि हाँगकाँगला निर्यात करण्यात येत होते.

तस्करी करणाऱ्या टोळीमार्फत प्रथमत: शार्क माशाला पकडण्यात येतं. त्यानंतर त्यांचे कल्ले कापले जातात. शार्क माश्याचे कल्ले कापल्यानंतर त्यांना पुन्हा समुद्रात सोडलं जातं. मात्र कल्ले नसल्यामुळे शार्क मासे पोहू शकत नाहीत त्यामुळे ते बुडत समुद्राच्या तळाशी जातात आणि मृत्यूमुखी पडतात.

शार्क माशाच्या कल्ल्यांचा वापर सूप तयार होतो. चीन आणि व्हिएतनाममध्ये ‘शार्क फिन सूप’ला मोठी मागणी आहे. चीन आणि व्हिएतनाममध्ये मोठ मोठ्या कार्यक्रमांमधील जेवणामध्ये या सूपचा वापर होतो.
केवळ काही श्रीमंत लोकांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी शार्कसारख्या माशांचा बळी घेतला जातोय. या तस्करांना वेळीच आळा घातला नाही तर पुढच्या पिढीला शार्क केवळ इतिहासाच्या पुस्तकांमध्येच पाहायला मिळेल. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live