राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी या दिग्गज नेत्याची निवड

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 डिसेंबर 2019

मुंबई : विधानसभा निवडणुकीत जबरदस्त यश मिळविलेल्या आणि शिवसेना-काँग्रेससोबत सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष आणखी मजबूत करण्यात पाऊले उचलली असून, माथाडी कामगार नेते व माजी आमदार शशिकांत शिंदे यांचे प्रदेशाध्यक्षपदासाठी नाव जवळपास निश्चित केले आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीत जबरदस्त यश मिळविलेल्या आणि शिवसेना-काँग्रेससोबत सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष आणखी मजबूत करण्यात पाऊले उचलली असून, माथाडी कामगार नेते व माजी आमदार शशिकांत शिंदे यांचे प्रदेशाध्यक्षपदासाठी नाव जवळपास निश्चित केले आहे.

पक्षातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव करण्यात शशिकांत शिंदे यांचा मोठा वाटा होता. मात्र, त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरु केल्या आहेत. विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले असून, त्यांच्याकडे अर्थमंत्रीपद आहे. त्यामुळे जयंत पाटलांचे उत्तराधिकारी म्हणून शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडणार हे निश्चित आहे. या पदाच्या शर्यतीत जितेंद्र आव्हाड आणि धनंजय मुंडे यांचेही नावे होती. पण, पश्चिम महाराष्ट्रात ताकद असलेल्या राष्ट्रवादीने शिंदे यांच्या नावावरच शिक्कामोर्तब केल्याचे सांगण्यात येत आहे.

मंत्रिपद मिळणाऱ्या नेत्यांना पक्ष संघटनेच्या कामासाठी पुरेसा वेळ मिळणार नसल्याने शशिकांत शिंदे यांच्या नावाला पसंती मिळाल्याचे दिसत आहे. 30 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून, यामध्ये राष्ट्रवादीचे सुमारे 12 नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या नेत्यांमध्ये जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे यांचे नाव निश्चित मानण्यात येत आहे. शिंदे यांनी याविषयी हिंदुस्तान टाई्म्सशी बोलताना म्हटले आहे, की याबाबत अद्याप मला काही माहिती नाही. पक्षात घडत असलेल्या या नव्या घडामोडींची मला माहिती नाही. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून याबाबत अद्याप अधिकृतरित्या कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही. शरद पवार जे काही माझ्यावर जबाबदारी टाकतील, ती पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न करतो. 

कोण आहेत शशिकांत शिंदे
शशिकांत शिंदे हे एक मराठा नेते असून, सातारा जिल्ह्यात त्यांची वेगळी ओळख आहे. कोरेगाव मतदारसंघातून ते दोनवेळा आमदार राहिलेले आहेत. मुंबई आणि नवी मुंबईतील माथाडी कामगारांचे नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे. 

 

Web Title: Shashikant Shinde to be next state NCP chief says sources


संबंधित बातम्या

Saam TV Live