स्थापनादिनीच भाजप झाले 'खामोश'; 'शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये..

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 6 एप्रिल 2019

नवी दिल्ली : बिहारमधील भाजपचे खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आज (शनिवार) काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी बंडखोरी करत भाजपवर टीका केली होती. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची नुकतीच त्यांनी भेट घेत काँग्रेसमध्ये जाण्याचे स्पष्ट केले होते. जड अंतःकरणाने भाजप सोडत आहे, असे सिन्हा यांनी म्हटले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने भाजपला मोठा धक्का समजला जात आहे. सिन्हा हे म्हणाले होते, की सर्वकाही ठीक असून, मी लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. हो, मी काँग्रेसमध्ये जात आहे. आज काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, के. सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

बिहारमधील पाटणासाहेब लोकसभा मतदारसंघातून शत्रुघ्न सिन्हा भाजपचे खासदार आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शत्रुघ्न सिन्हा यांनी सतत भाजपवर टीका करत बंडखोरी केली होती. आता भाजपनेही त्यांना पाटणासाहेबमधून उमेदवारी दिलेली नाही. त्यामुळे भाजपची शॉटगन काँग्रेसच्या हाती लागली आहे. पाटणासाहेबमधून काँग्रेसने शत्रुघ्न सिन्हांना उमेदवारी दिल्यास केंद्रीयमंत्री रवीशंकर प्रसाद यांच्याशी लढत होणार आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live