श्री छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा छिंदम लढवणार निवडणूक

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द वापरून वादग्रस्त झालेला माजी उपमहापाैर श्रीपाद छिंदम याने महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग नऊमधून आज अर्ज दाखल केला. यापूर्वी भाजपतर्फे नगरसेवक राहिलेल्या चिंदंला अपक्ष म्हणून अर्ज भरावा लागला आहे . 

मोठा वाद होऊनही छिंदम याने केलेली संपर्क मोहीम आणि भरलेला अर्ज याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.

प्रभाग क्रमांक नऊमधून छिंदम याने मागील महिनाभरापासून जोरदार तयारी केली होती. घरोघरी जाऊन झालेल्या प्रकाराबाद्दल माफी मागत आपण महापालिकेच्या म्हणजेच नागरिकांच्या कामाबाबतच संबंधिक कर्मचाऱ्यास बोललो, असे सांगून बाजू सावरून त्याने घेतली.

त्याच वेळी छिंदम रिंगणात उतरेल, अशी चर्चा होती. अखेर आज त्याने अर्ज दाखल केल्याने राजकीय मंडळींच्या भुवया उंचावल्या आहेत. या प्रभागात असलेल्या पदमशाली समाजातील मते छिंदम याला मिळतात. त्यामुळे या प्रभागाकडे विशेष लक्ष लागणार आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live