फोर्ड फिगो कारने बसला दिली धडक; वणीतील तीघे जागीच ठार, एक गंभीर जखमी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 24 जानेवारी 2019

वणी (नाशिक)  -  मुंबई -आग्रा महामार्गावर चांदवड येथील रेणूका मंदीराजवळ फोर्ड फिगो कारने राज्य परीवहन महामंडळाच्या बसला पाठीमागून धडक दिल्याने वणी येथील तीघे जागीच ठार झाले. तर एक गंभीर जखमी झाले आहे. धुळे येथून भाचीचे लग्न आटोपून वणी येथे परतांना वणीतील संजय समदडिया यांचेसह कुटुंबीयावर काळाने झडप घातली.

येथील महेंद्र (संजय) समदडिया हे धुळे येथे आपल्या भाचीच्या विवाह समारंभासाठी सोमवारी सकाळी वणीहून धुळे येथे गेले होते. काल ता.२३ रोजी सांयकाळी भाचीचे लग्न संपन्न झाल्यानंतर आज सकाळी साडे आठच्या दरम्यान धुळे येथून पत्नी व मुलासह महेंद्र समदडिया हे वणी येथे येण्यासाठी निघाले होते. आज सकाळी साडे दहा वाजेच्या दरम्यान चांदवड येथील रेणूका मंदीरा जवळ बसला कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने महेंद्र समदडीया वय. ५०, वंदना समदडिया ( वय. ४८) पत्नी, हिमांशु समदडिया ( वय १८) मुलगा हे जागीच ठार झाले. तर हार्दिक समदडिया (मुलगा) वय. १८ हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

महेंद्र समदडिया हे येथील किसनलालजी बोरा इंग्लिश मेडीयम स्कूल संस्थेचे संस्थापक संचालक तसेच सप्तशृंगी बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संचालक पदावर होते. 

दरम्यान येथे अपघाताचे वृत कळताच सर्वत्र शोककळा पसरली असून, जवळचे नातेवाईक हे घटनास्थळी रवाना झाले आहे.

Web Title: Ford figo car hit the bus near wani, in which 3 died and 1 injured

संबंधित बातम्या

Saam TV Live