...म्हणून त्या रेल्वे कर्मचाऱ्याने स्वत:चा व्हिडिओ बनवून धावत्या रल्वे समोर उडी घेतली   

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

राहुरीत रेल्वे अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून एका कर्मचाऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडलीय. राहुरी तालुक्यातील वांबोरी इथं ही घटना घडलीय. बबलू असं आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. मंजूर केलेली रजा रद्द करून कामावर रूजू होण्यास सांगितल्यानं बबलूनं आत्महत्या केल्याचा आरोप रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलाय.

जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्याला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेहाला हात लावणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेत वांबोरी रेल्वे स्थानकावर कर्मचाऱ्यांनी रेल रोकोही केला. मात्र लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासोबत बबलूच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचं आश्वासन रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलंय.

शिवाय बबलूच्या भावाला रेल्वेत सामावून घेतलं जाणारंय. दरम्यान आत्महत्या केलेल्या बबलूचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. यात आपल्यावर अऩ्याय होत असल्याचा आरोप बबलूनं केलाय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live