आज शिर्डीत साईबाबांचा शंभरावा पुण्यतिथी उत्सव तर कोल्हापूरात दसरा चौकात शाही दसरा सोहळा 

आज शिर्डीत साईबाबांचा शंभरावा पुण्यतिथी उत्सव तर कोल्हापूरात दसरा चौकात शाही दसरा सोहळा 

आज शिर्डीत साईबाबांचा शंभरावा पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातोय. शिर्डीत तीन दिवस या उत्सवाची धूम असते. विजयादशमीच्या मुख्य दिवशी साई समाधीचे दर्शन घेण्यासाठी साईभक्तांनी शिर्डी फुलून गेली आहे.

विजयादशमीच्या दिवशी 1918 साली साईबाबांनी आपल्या शरीराचा त्याग केला या घटनेला आज शंभर वर्षे पुर्ण झाली आहेत. गेल्या शंभर वर्षांपासून हा पुण्यतीथी उत्सव शिर्डीत साजरा होतोय, हजारो भाविक आपल्या आराध्य साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीत येत असतात.

कोल्हापूरात दसरा चौकात शाही दसरा सोहळा

कोल्हापूरात शारदीय नवरात्रौत्सवात खंडेनवमी अर्थात विजयादशमी साजरी होत आहे. यानिमित्त श्री अंबाबाईची रथातील पूजा बांधण्यात येत असून, संध्याकाळी दसरा चौकात शाही दसरा सोहळा होणार आहे. दसऱ्याला देवस्थान समितीच्या वतीने श्री अंबाबाई, महाकाली व महासरस्वती या तीनही देवतांना मानाची साडी अर्पण करण्यात येणार आहे. या साडीवरच श्री अंबाबाईची रथातील सालंकृत पूजा बांधली जाईल.

संध्याकाळी तोफेच्या सलामीनंतर श्री अंबाबाईची उत्सवमूर्ती पालखीत विराजमान होऊन आपल्या लवाजम्यानिशी निघेल. तसंच पंढरपूरमध्ये विजया दशमीनिमित्त विठूरायाला लाल रंगाचे अंगी आणि शुभ्र सोवळं नेसवण्यात आलंय. तुळशी हार, बाजूबंद, बाजीराव कंठी, पेटी हार अशा मौल्यवान दागिन्यांनी विठूरायाला सजवण्यात आलं. तर, रुक्मिणी मातेला दुर्गादेवीच्या रुपात पारंपरिक अलंकाराने सजवलंय.

Webtitle : marathi news shirdi sai samadhi utsav and kolhapur shahi dasara utsav 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com