जाणून घेऊयात शिवसेनेचा प्रवास : १९९५ ते २०१९

जाणून घेऊयात शिवसेनेचा प्रवास : १९९५ ते २०१९

मुंबई - उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असताना १९९५ च्या आठवणी जाग्या झाल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मोहिनी अवघ्या महाराष्ट्रावर होती. मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेचे पहिलेच मुख्यमंत्री. १९९५ साली सत्तेत येताना भाजपने गृह, अर्थ, ऊर्जा अशा खात्यांसाठी आग्रह धरला; तो मान्यही झाला. १९९५ ते १९९९ या कालावधीत गरिबांना घरे, एक रुपयात झुणका-भाकर अशा अनेक योजना राबविल्या गेल्या. 

१९९९ साली शिवसेना नाही म्हणत असतानाही भाजपने काही महिने आधीच मतदानाला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. जागा कमी झाल्या अन्‌  निवडणुकांच्या काही महिने आधी मनोहर जोशी यांना हटवून मुख्यमंत्री झालेल्या नारायण राणे यांना पाठिंब्याचे पत्र देण्यास गोपीनाथ मुंडे यांनी विलंब लावला. विरोधी पक्षनेतेपदी निवड झालेल्या विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर विरोधी बाकांवर गेलेल्या युतीने परस्परांना धरून ठेवले. आज सर्वोच्च पदावर पोचलेले उद्धव ठाकरे त्या काळात सक्रिय झाले. शिवसेनेत या काळात प्रचंड घडामोडी सुरू होत्या. २००३ साली उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्यप्रमुख झाले अन्‌ नारायण राणे, राज ठाकरे अस्वस्थ झाले. त्या दोघांचे बंड, शिवसेनाप्रमुखांचे आजारपण, या घटनांमुळे ‘मातोश्री’ विदग्ध झाली होती. यादरम्यान झालेल्या लोकसभेत मुंबईत मनसेने केलेल्या विभाजनामुळे शिवसेनेचा एकही खासदार निवडून आला नाही. भाजपशी असलेले नाते एकीकडे चिरेबंदी करतानाच शिवसेना नव्या परिस्थितीशी जुळवून घेत होती. अशा काळातच नरेंद्र मोदी राष्ट्रीय पटलावर आले अन्‌ भाजप आक्रमक झाली. २०१४ च्या निवडणुकीत भाजपला यश मिळाल्यावर विधानसभेत जागावाटपावरून वाद झाला. त्यानंतर दोघांचे रस्ते भिन्न झाले. मात्र, काही काळ विरोधी बाकांवर घालवल्यावर दोघे पुन्हा एक झाले. नंतर दोन्ही पक्षांत कुरघोडीचे राजकारण सुरू झाले होते. आता २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर युती संपुष्टात आली. मार्ग वेगळे झाले आहेत आणि आता उद्धव ठाकरे हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने मुख्यमंत्री झाले आहेत.

Web Title: Shiv-Senas-journey 1995 to 2019

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com