(Video) - दोन मिनिट जरी उशीर झाला असता तरी अपघातग्रस बोटीतील कुणीही वाचलं नसतं

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

शिवस्मारकाच्या पायाभरणीला अपघाताचं गालबोट लागलंय. शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी गिरगावजवळच्या समुद्रात गेलेल्या बोटीला अपघात झालाय. अपघातग्रस्त स्पिड बोटीत जवळपास शंभर जण होते. स्पिड बोट वेगात असताना ही बोट नियोजित स्मारकाजवळच्या खडकावर आदळली. त्यानंतर बोटीत वेगानं पाणी शिरायला सुरूवात झाली.

बोटीत पाणी शिरल्यानंतर बोटीत एकच गोंधळ उडाल्याचं सांगण्यात येतंय. बोटीतला सिद्धेश पवार नावाचा कार्यकर्ता बेपत्ता झालाय. दुर्घटनाग्रस्त बोटीतल्या प्रवाशांचा अनुभव अंगावर शहारे आणणारा होता.

या अपघातामुळे शिवस्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम रद्द करण्यात आलाय. समुद्रात गेलेल्या पाच बोटींत सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजना नव्हत्या. हा अपघात सरकारसाठी मोठा धडा ठरलाय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live