चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा ‘इतिहास’ पुसण्याचा घाट..

सिद्धेश सावंत
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा ‘इतिहास’ पुसण्याचा घाट..

राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा पराक्रम उघड..

चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहासच हद्दपार..
 
चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा ‘इतिहास’ पुसण्याचा घाट..

राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा पराक्रम उघड..

चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहासच हद्दपार..
 
मुंबई : राज्यातील शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांना स्थानिक संस्कृती जपत आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावं असा प्रयत्न केला जातोय.
या हेतूने ‘स्थानिक’ भाषा माध्यमातील शाळांना शिक्षण विभागाने ‘आंतरराष्ट्रीय’ असं बिरूद चिकटवलंय.
 त्यासाठी महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळही सुरू करण्यात आलं.. 
गेल्यावर्षी पुस्तकांविनाच चालणाऱ्या या शाळांसाठी यंदा पहिली ते चौथीची पुस्तके ऑगस्ट महिन्यात छापण्यात आली. त्यातून ही बाब समोर आली आहे. 
आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीच्या पुस्तकात शिवाजी महाराजांच्या वेगळ्या पैलूंची ओळख तर सोडाच पण आतापर्यंत राज्यमंडळाच्या पुस्तकांत गोष्टीरुपात मांडण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पराक्रम, लढाया याचाही समावेश केलेला दिसत नाहीये. 
केवळ  भारतीय लोक या घटकांत शिवाजी महाराज, रामदास स्वामी, एकलव्य, लाल बहादूर शास्त्री आणि हनुमान यांची त्रोटक माहिती देण्यात आलेली आहे. 

LINK :: https://youtu.be/Wam6x25QjwE

Web Title - Shivaji Maharaj History discarded from 4th standerst study 

संबंधित बातम्या

Saam TV Live