...म्हणून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची घटवली आणि तलवारीची उंची वाढवली

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 16 जुलै 2018

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्यात मुख्यमंत्री जे बोलले होते त्याचाच त्यांना विसर पडलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा खर्च वाचवण्यासाठी सरकारनं हातचलाखी केलीय. सरकारनं चक्क पुतळ्याची उंची कमी करून तलवारीची उंची वाढवलीय.

आराखड्यानुसार या पुतळ्याची तलवारीसकट उंची 121. 2 मीटर होती. यातल्या महाराजांच्या पुतळ्याची उंची 83.2 मीटरवरून 75.7 मीटर एवढी घटवण्यात आली. तर तलवारीची उंची 38 मीटरवरून 45.5 मीटर करण्यात आली. यात पुतळ्याची एकूण उंची 121.2 मीटरच राहणार आहे. पण या हातचलाखीत स्मारकाचा खर्च 338 कोटी रूपयांनी कमी होणार आहे.  

विरोधकांनी सरकारनं केलेल्या हातचलाखीवर टीका केलीय. आघाडी सरकारनं या स्मारकाची घोषणा केली होती. मोदींनी या स्मारकाचं जलपूजन केलं. पण अजूनही या स्मारकाची एकही वीट रचण्यात आलेली नाही. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राजकीय पक्ष फक्त राजकारण करतायत का असा प्रश्न निर्माण झालाय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live