आज शिवभोजन थाळी महाशिवरात्री स्पेशल जोवण

सरकारनामा
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

नगर : महाशिवरात्रीनिमित्त आज (शुक्रवारी) शिवभोजन थाळीत गरजूंना फराळाचा आस्वाद घेता यावा, यासाठी थाळीत बदल करण्यात आला आहे. त्यात शेंगदाण्याची आमटी, राजगिऱ्याचा भात- चपाती, बटाट्याची भाजी या पदार्थांचा समावेश असणार आहे. केंद्रचालकांना थाळीत उपवासाचे मेनू निश्‍चित प्रमाणातच द्यावे लागणार असून, प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाने गरजू मात्र सुखावणार आहेत.

महाशिवरात्रीनिमित्त शासनादेशाची पूर्ण दक्षता घेत नगरचे जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने उचललेले पाऊल दिशादर्शक ठरणार आहे. गरजूंची मागणी लक्षात घेता, शहरात मंजूर केलेल्या शिवभोजन थाळीत प्रशासनाने तीन केंद्रांवर 200 थाळ्यांची वाढ केली आहे. महाशिवरात्रीनिमित्त देशभर निष्ठेने उपवास केला जातो. महाशिवरात्र, आषाढी एकादशीच्या दिवशी बहुसंख्य लोक उपवास करतात. त्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाशिवरात्रीला शिवभोजन केंद्रात उपवासाचे पदार्थ मिळतील का, अशी चर्चा होती. त्यावर शासन निर्देशाची काटेकोर अंमलबजावणी करीत, निश्‍चित प्रमाणात महाशिवरात्रीच्या शिवभोजनाची सुविधा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यात शिवभोजन योजनेत एखाद्याला नियमित जेवण करायचे असेल, तर तेही उपलब्ध होणार आहे.

नेहमीचे भोजनही मिळणार
ग्राहकाचे समाधान होत असेल, तर फराळाचे पदार्थ केंद्रचालक देऊ शकेल. मात्र, याव्यतिरिक्त एखाद्या ग्राहकाने नेहमीच्या भोजनाची इच्छा व्यक्त केल्यास तेही उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. शासनादेशानुसार शिवभोजनातील पदार्थांचे प्रमाण ठरवून दिले आहे. त्या प्रमाणाचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.

Web Title -  shivbhojan mahashivratri special menu

संबंधित बातम्या

Saam TV Live