'शिवनेरी' आणि 'अश्वमेघ' या गाड्यांच्या तिकिट दरात कपात

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 4 जुलै 2019

राज्य परिवहन बससेवेतील शिवनेरी आणि अश्वमेघ या गाड्यांच्या तिकिट दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिकाधिक प्रवाशांनी या गाड्यांचा वापर करावा, यासाठी तिकिट दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे एसटी प्रशासनाने म्हटले आहे. शिवनेरी आणि अश्वमेघ या दोन्ही सेवा आरामदायी प्रवासासाठी परिचित आहेत. आतापर्यंत उच्च मध्यमवर्गाकडूनच या सेवेचा वापर केला जातो. तिकिट दरात ८० ते १२० रुपयापर्यंत कपात करण्यात आली आहे. येत्या सोमवार, ८ जुलैपासून नवे दर लागू होणार आहेत.

सध्या राज्यात सात वेगवेगळ्या मार्गावर शिवनेरीची बससेवा सुरू आहे. पण प्रामुख्याने पुणे ते मुंबई या मार्गावर शिवनेरीची प्रवासी संख्या जास्त आहे. या मार्गावर प्रवाशांकडून शिवनेरीचा वापर केला जातो. एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार महिन्याला शिवनेरीतून दीड लाख नागरिक प्रवास करतात. 

Web Title: shivneri ashwamegh bus travel become cheap in maharashtra

संबंधित बातम्या

Saam TV Live