रायगडचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीकडे गेल्यावरून शिवसेनेमध्ये नाराजी

सरकारनामा
शनिवार, 11 जानेवारी 2020

रायगड : महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली.  शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला पण यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या रायगडमध्ये शिवसेनेसमोर अडचणी निर्माण होत आहेत.  महाविकास आघाडीचे घटक राष्ट्रवादीच्या कोट्यातुन रायगडचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना मिळाले. यावरून रायगडच्या शिवसैनिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.  

दोन दिवसांपुर्वी माणगाव येथे झालेल्या सभेत आणि आज महाडमध्ये झालेल्या सभेत शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी हि नाराजी व्यक्त करीत राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. रायगड वर शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे, रायगडचा पालकमंत्री शिवसेनेचाच पाहिजे या मागणीसाठी पक्षप्रमुखांकडे मागणी केली जाणार आहे. संघटनेने या मागणीचा विचार केला नाही तर राजीनामा देऊन शिवसैनिक, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी राजीनामा देणार आहेत.

Web Title: Shivsainik unhappy about NCP minister appointment

संबंधित बातम्या

Saam TV Live