''शिवसेनेचे तब्बल 45 आमदार भाजपच्या संपर्कात''- संजय काकडे

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

पुणे : शिवसेनेच्या 56 पैकी तब्बल 45 खासदारांना भाजपबरोबरील सत्तेत सहभागी होण्याची तीव्र इच्छा असून त्यांच्या-त्यांच्या नेत्यांमार्फत ते भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपचे राज्य सभेतील सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केला आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये छगन भुजबळ, अजित पवार, जयंत पाटील यांना मानणारे आमदार त्यांच्यामागे आहेत. त्याच धर्तीवर शिवसेनेमध्येही चार प्रमुख नेत्यांना 'फॉलो' करणारे आमदार आहेत. या आमदारांना राज्य सरकारमध्ये सत्ताधारी पक्षाचे सदस्य म्हणून सहभागी व्हायचे आहे. मात्र, शिवसेनेचे नेते सरकार स्थापन करण्यासाठी ताणून धरीत आहेत. त्यामुळे हे आमदार चलबिचल झाले आहेत. त्यांनी त्यांच्या- त्यांच्या नेत्यांकडे सरकारमध्ये सहभागी होण्याचा दबाव वाढविला आहे. ते चार नेते भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत, असा दावा काकडे यांनी केला आहे.

युतीमध्ये शिवसेनेच्या आमदारांना मतदारांनी सत्ताधारी पक्षाचे सदस्य व्हावेत म्हणून कौल दिला आहे. विरोधात बसण्यासाठी कौल दिलेला नाही. मतदारांनी युतीचा धर्म पाळला आहे. आता शिवसेनेनेही मतदारांच्या इच्छेचा मान ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली सरकारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही काकडे यांनी केले आहे.

Web Tile Shivsena 45 MLA With BJP Said By Sanjay Kakade

संबंधित बातम्या

Saam TV Live