शिवाजी महाराज भाजपनं हायजॅक केले; तर आता रामावर शिवसेनेचा दावा

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत आक्रमक प्रचार केला. शिवाजी महाराजांचं नाव आणि मोदी लाटेच्या जोरावर भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. मुख्यमंत्रीही प्रत्येक व्यासपीठावर शिवाजी महाराजांचं नाव घेतातच घेतात.

भाजपनं शिवाजी महाराज हायजॅक केल्यानंतर चवताळलेल्या शिवसेनेनं आता रामावरच दावा ठोकलाय. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी तुम्ही नाही म्हणा राम मंदिर आम्ही बांधतो अशी अरोळीच ठोकली.

भाजपची हिंदू व्होट बँक काबीज करण्यासाठी शिवसेनेनं राम मंदिराचा मुद्दा उचलल्याचं सांगण्यात येतंय.

शिवाजी महाराजांच्या नामघोषानं भाजपला सत्ता दिली. आता शिवसेनेचा रामाचा प्रयोग यशस्वी होतो का हे पाहावं लागेल.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live