भाजपविरोधातल्या महाआघाडीला प्रकाश आंबेडकरांचा सुरुंग; काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी न करण्याचे स्पष्ट संकेत

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भाजपविरोधात सक्षम महाआघाडी अनेक पक्षांना करायचीय पण प्रत्येक पक्षाच्या अटीशर्ती आणि हेकेखोरपणा यात अडसर ठरतोय.

प्रकाश आंबेडकरांनी आधीच राष्ट्रवादीशी आघाडी करण्यास नकार दिलाय. तर काँग्रेसनंही राष्ट्रवादीशिवाय आघाडी करणार नसल्याची भूमिका घेतलीय.

काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनंही यायची तयारी दर्शवलीय. पण प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनंही महाआघाडीसोबत यावं अशी गळ राजू शेट्टींनी घातलीय.

सगळ्या विरोधकांना आपापल्या राजकीय ताकदीची पूर्ण कल्पनाही आहे. तरीही विरोधकांमध्ये सासू-सुनांची भांडणं पाहायला मिळतात. ही बाब भाजप आणि शिवसेनेच्या पथ्यावरच पडणार हे निश्चित.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live