निवडणुकीआधीच भाजप-शिवसेना आमदारांच्या मनात धडधड वाढली 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

शिवसेना आणि भाजपच्या विद्यमान आमदारांच्या मनातली धडधड आता चांगलीच वाढलेय. त्याचं कारणही तसंच आहे. दोन्ही पक्षातल्या आमदारांवर सध्या तिकीट कापलं जाण्याची टांगती तलावर आहे. त्यामुळे तिकीटवाटप होईपर्यंत तरी ही धाकधूक कायम राहणार आहे. 

शिवसेनेच्या कोअर कमिटीने तिकीट कापण्यासाठी  आमदारांची यादी बनवल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांची धास्ती वाढली आहे. 

  • काही आमदारांची कामगिरी ही अपेक्षेनुरुप राहिली नाही
  • लोकसभा निवडणुकीत काहींना चांगलं काम करता आलं नाही
  • काही जणांविरोधात पक्षांतर्गत तक्रारी आहेत
  • तर काहींना लोकोपयोगी कामांमध्ये भरीव योगदान देता आलेले नाही
  • कोअर कमिटीकडून आमदारांना डच्चू देण्यासाठी यादी तयार असल्याची सूत्रांची माहिती

तर तिकडे शिवसेनेच्या मित्रपक्षातही परिस्थिती काही वेगळी नाहीए...विविध कारणांमुळे भाजपचे विद्यमान आमदारही धास्तावलेत.

  • भाजपकडून आमदारांच्या कामाचं मूल्यमापन 
  • भाजपच्या काही जागांवर शिवसेनेचा दावा
  • नागपुरातील 12 पैकी 5 जागांवर सेनेने दावा केल्याची चर्चा
  • सेनेकडे 125 जागा गेल्यास भाजपच्या विद्यमान आमदारांवर टांगती तलवार 

शिवसेना भाजपची युती होणार का? या प्रश्नाचं उत्तरही अद्याप मिळायची आहेत. त्यामुळे जागावाटबद्दलही अजून चित्र स्पष्ट नाही. अशात आणखी काही दिवसतरी दोन्ही पक्षातले विद्यमान आमदार गॅसवरच राहणार आहेत.

WebTitle : marathi news shivsena bjp ticket distribution many seating MLA may  not get ticket for vidhansabha 

संबंधित बातम्या

Saam TV Live