VIDEO | सेनेच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

साम टीव्ही न्यूज
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

मुंबई : शिवसेना सत्तेचं स्टेरिंग लवकरच हाती घेईल असे संकेत मिळतेय. कारण आतापर्यंत शिवसेना पालखीची भोई होती. आता सेनेचा मुख्यमंत्री पालखीत बसेल असं सूचक वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय. हॉटेल रिट्रीटवर काहीच वेळापूर्वी बैठक पार पडली. यामध्ये उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलंय..याशिवाय आपलचं सरकार येणार असंही उद्धव ठाकरे म्हणाले..त्यामुळं पुन्हा एकदा युतीच्या सत्तेच्या चर्चेला उधाण आलंय. काल रात्री आदित्य ठाकरेंनी या आमदारांची भेट घेतली. आणि याच हॉटेलवर मुक्काम केला. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी शिवसैनिकांनी केलीय...‘मातोश्री’ परिसरात याबाबत पोस्टरबाजी करण्यात आलीय. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी या पोस्टरबाजी करण्यात आलीय.

 शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावून घेतलेले होते. त्यांची व्यवस्था वांद्रे येथील रंगशारदा हॉटेलमध्ये करण्यात आली होती. मात्र, रंगशारदातील अडचण लक्षात घेऊन शिवसेनेने आपल्या आमदारांची व्यवस्था मालाड येथील 'द रिट्रीट' हॉटेलमध्ये केली. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवारी रात्री सर्व आमदारांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आज (रविवार) दुपारी या सर्व आमदारांशी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी चर्चा केली. 

 

Web Title: Shivsena chief Uddhav Thackeray claim CM Post in maharashtra


संबंधित बातम्या

Saam TV Live