VIDEO | आता महा-शिव-आघाडीचे संकेत, भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी नवं समीकरण

साम टीव्ही न्यूज
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 15 दिवसांपासून निर्माण झालेली सत्ताकोंडी फुटण्याची चिन्हं आहेत. भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेसने सरकारला हात देण्याची तयारी केल्याचं समजतंय. नेमकं काय होईल पाहूया सविस्तर विश्लेषणातून...

आमदार फुटू नयेत यासाठीची खबरदारी म्हणून काँग्रेसनं आपल्या आमदारांना जयपूरला नेलंय. आज सत्ता संघर्ष तीव्र होताच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह काँग्रेसचे राज्यातील दिग्गज नेते जयपूरात दाखल झालेत. तिथं काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक झाली. या बैठकीत एखादा अपवाद वगळता सर्व आमदारांनी शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्यास होकार दिल्याचं समजतं. त्यामुळं भाजपला वगळून राज्यात सत्तेचं नवं समीकरण आकाराला येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्रिपदासह २५ मंत्रिपदं शिवसेनेला, उर्वरीत राष्ट्रवादीला आणि विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला असं सत्तेचं वाटप होण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेसच्या आमदारांनी शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्यास अनुकूलता दर्शवली असली तरी अंतिम निर्णय काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतरच होणार आहे.

WEB TITLE 

संबंधित बातम्या

Saam TV Live