भारिप- MIM आघाडीवर शिवसेनेची टीका तर काँग्रेस-NCP ची आंबेडकरांशी चर्चेची तयारी 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

प्रकाश आंबेडकरांचा भारिप बहुजन महासंघ आणि ओवैसींचा एमआयएम आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांसाठी एकत्र येत आहेत. दलित-मुस्लिम ऐक्याच्या या राजकीय प्रयोगावर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. प्रकाश आंबेडकर- ओवेसी आघाडी म्हणजे नवं डबकंच असल्याची बोचरी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामनामधून केलीय.

प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी एकत्र येऊन नवे डबके तयार केलं असून दलित आणि मुसलमानांनी एकत्र येऊन ही डबकी उधळून लावली पाहिजेत, असं मत शिवसेनेने व्यक्त केलंय. २०१९ च्या निवडणुकीत कुणाला ‘चारायचे’ आणि कुणाला ‘पाडायचे’ यासाठी ठरवून टाकलेला हा डाव असल्याचा टोलाही शिवसेनेनं अप्रत्यक्षपणे भाजपला लगावलाय. 

दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सावध पवित्रा घेत प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करण्याचे संकेत दिलेत.

दलित-मुस्लिम ऐक्याचे प्रयोग यापूर्वीही अनेकदा झालेत. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. हे दोन पक्ष आता एकत्र येत आहेत. साहजिकच हे दोन पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीसह महाआघाडीत सामील झाले नाहीत तर धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फूट पडेल आणि त्याचा फायदा भाजप-मित्रपक्षांना होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live