शिवसेना काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी, वाचा, सविस्तर...

साम टीव्ही
मंगळवार, 16 जून 2020

सरकारच्या निर्णयप्रक्रियेत सामावून घेतलं जात नाही अशी काँग्रेसची तक्रार आहे. यावरून शिवसेनेच्या मुखपत्रातून काँग्रेसला टोले लगावण्यात आलेत. काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी आणि किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा अनुभव त्यांना आहे असा टोला शिवसेनेच्या मुखपत्रातून लगावण्यात आलाय.

सरकारच्या निर्णयप्रक्रियेत सामावून घेतलं जात नाही अशी काँग्रेसची तक्रार आहे. यावरून शिवसेनेच्या मुखपत्रातून काँग्रेसला टोले लगावण्यात आलेत. काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी आणि किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा अनुभव त्यांना आहे असा टोला शिवसेनेच्या मुखपत्रातून लगावण्यात आलाय. राजकारण हे अखेरीस सत्तेसाठीच असते. सत्ता कोणाला नको असं नव्हे.पण उद्धव ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील असे नेते नाहीत असंही यात म्हटलंय. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रिपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्याग मोलाचा आहे हे विसरता येणार नाही. खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करू नये. असं सांगत सत्तेला धोका नसल्यांचं अधोरेखित करण्यात आलंय.

महाविकास आघाडी सरकारच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सहभागी केले जात नसल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. मात्र तत्पूर्वीच शिवसेनेच्या मुखपत्रातून काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात आली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून अपूर्ण माहितीवर हा अग्रलेख लिहिल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनी दिलीय. तसेच आम्ही जनतेच्या हितासाठी लढत असून, आमची भूमिका मुख्यमंत्र्यासमोर मांडू असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

दरम्यान, कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज आणि उद्या, सलग दोन दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतायत. महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात, राजस्थान,  उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, बिहार, आंध्र प्रदेश, हरयाणा, जम्मू-काश्मीर, तेलंगण आणि ओडिशा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ते चर्चा करतायत. या राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. मुख्यमंत्र्यांशी होणारी ही सहावी आणि सातवी बैठक असेल.  टाळेबंदी शिथिल करण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती.


संबंधित बातम्या

Saam TV Live