(video) - दसरा मेळावा... शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य फुंकलं जातं तो दिवस

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

 दसरा मेळावा म्हणजे शिवसेनेच्या शक्ती प्रदर्शनाचे हक्काचे व्यासपीठ. राज्यभरातून या मेळाव्याला शिवसैनिक उपस्थित राहतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दसरा मेळाव्यातून शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य फुंकत.

बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंनी हे शिवधनुष्य पेललं. शिवसेनेच्या परंपरेनुसार दसरा मेळावा हा प्रत्येक शिवसैनिकासाठी स्फुर्तीस्थान असतं. 2019 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वीचा हा अखेरचा दसरा मेळावा असल्यानं उद्धव ठाकरे काय बोलणार याचीच सगळ्यांना उत्सुकता लागलीय.

शिवसेनेच्या परंपरेनुसार या मेळव्याची जबाबदारी प्रामुख्याने शिवसेनेच्या मुंबईतील पदाधिकाऱयावर देण्याचे संकेत होते पण यंदाच्या दसरा मेळव्याची जबाबदारी शिवसेना नेते आणि कॅबिनेटमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खाद्यांवर देण्यात आलीय.

आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी यापूर्वीच केलीय. मात्र त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मातोश्रीला भेट देत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. तरीही शिवसेनेकडून भाजपवर दररोज टीकेचे बाण सोडले जातातच. त्यामुळं दसऱ्या मेळाव्यात युतीबाबत उद्धव ठाकरे काय भाष्य करतात याकडे भाजपासह इतर राजकीय पक्षांचे लक्ष लागलंय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live