पुरावे द्या; शिवसैनिकांना तात्काळ अटक करायला लावतो - दीपक केसरकर

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 25 एप्रिल 2018

नगर : केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडानंतर सात एप्रिल रोजी घटनास्थळी पोलिसांच्या कारवाईत अडथळे निर्माण करुन परिसरात नासधूस केल्याबद्दल शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यासह सहाशे शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र, शिवसैनिकांच्या विरोधात पोलिसांकडे पुरावेच नाहीत. ते आणून देण्याचे काम करा, शिवसैनिकांना तात्काळ अटक करायला लावतो, अशी भूमिका गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. 

केडगावमधील पोटनिवडणुकीनंतर सात एप्रिल रोजी शिवसेना उपशहर प्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून व त्यानंतर गळे चिरून हत्या करण्यात आली. त्यानंतर शिवसैनिकांनी तेथे धुडगुस घालत पोलिसांच्या कारवाईत अडथळे निर्माण केले.

त्यावरुन सहायक फौजदार लक्ष्मण हंडाळ यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासह 600 शिवसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, या गुन्ह्यातील एकाही आरोपीला अजून पोलिसांनी अटक केलेली नाही.

त्या संदर्भात पत्रकारांनी छेडले असता ते बोलत होते. गृहराज्यमंत्री केसरकर यांनी आज जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. तसेच पोलिसांकडून तपासाबाबत माहिती घेतली. 

दरम्यान, आजही गुन्हा दाखल असलेले अनेक शिवसैनिक राजरोजपणे ठाकरे व केसरकर यांच्या दौऱ्यात पोलिसांसमोर उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Saam TV Live